चित्रकला, वक्तृत्व,निबंध ऑनलाइन स्पर्धा
भारतीय जनता युवा मोर्चाच्या रत्नागिरी तालुका शाखेने लॉकडाऊनच्या काळात चित्रकला, वक्तृत्व व निबंध अशा ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन केले आहे. दोन गटांसाठी ही स्पर्धा होणार आहे.
‘मी कलारत्न’ या चित्रकला स्पर्धेत 5 ते 17 वर्षे व 18 पासून पुढे खुल्या गटासाठी ‘कोरोना पूर्वीचे व नंतरचे दृष्य‘, ‘कोरोनाशी झुंज‘ हे विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, संत ज्ञानेश्वर महाराज, स्व. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे विषय दिले आहेत. स्पर्धा रत्नागिरी तालुका मर्यादित आहे. स्पर्धक सर्व प्रकारच्या रंगाचा वापर करू शकतात. चित्र स्केच, कार्टून किंवा पेंटींग स्वरूपात सादर करू शकतात. काढलेल्या चित्राचा उत्तम दर्जाचा फोटो पाठवावा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रविण देसाई यांच्याशी संपर्क साधावा.
वतृत्व स्पर्धेत 12 ते 17 वर्षे व 18 पासून पुढे या खुल्या वयोगटासाठी लॉकडाऊन आणि निसर्ग हा विषय आहे. आपल्या मनातील विचारांना स्पर्धेच्या माध्यमातून 3 मिनिटांच्या व्हिडीओद्वारे ई-मेलवर पाठवावेत. प्रथम तीन क्रमांकाना सन्मानित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संकेत बापट यांच्याशी संपर्क साधावा.
निबंध स्पर्धेसाठी 12 ते 17 वर्षे व 18 पासून पुढे सर्वांसाठी खुल्या वयोगटाला लॉकडाऊन आणि सामाजीक भान, लॉकडाऊन आणि भविष्यातील आव्हाने हे विषय दिले आहेत. निबंधासाठी किमान 300 ते कमाल 500 शब्द मर्यादा आहे. प्रथम तीन क्रमांकाना सन्मानित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी विक्रम जैन यांच्याशी संपर्क साधावा. सर्व स्पर्धांमधील सहभागी स्पर्धकांनी संपूर्ण नाव, जन्मतारीख, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक पाठवावा. e-mail : bjpforratnagiri@gmail.com या ई-मेलवर 3 मे पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाठवावे.