
एकही कोरोना रुग्ण नसलेला रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये तर एक कोरोना रुग्ण असलेला सिंधदुर्ग जिल्हा मात्र ग्रीन झोनमध्ये
केंद्र सरकारने नव्याने रेड ,ऑरेंज’ आणि ग्रीन जिल्ह्याची नवी यादी जाहीर केली आहे जिल्ह्यात असलेल्या रुग्णांची संख्या ,डबलिंग रेट ,टेस्टिंगची व्याप्ती आणि तज्ज्ञांचे निरीक्षण या निकषावर हे झोन ठरवण्यात आले आहेत मात्र सध्या एकही कोरोना रुग्ण नसलेला रत्नागिरी जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आला आहे तर कोराेनाचा सध्या एक रुग्ण असलेला सिंधुदुर्ग जिल्हा मात्र ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आला आहे
मुंबई, मुंबई उपनगरसह
१४ जिल्हे रेड झोनमध्येच ; पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांचा रेड झोन मध्ये समावेश आहे.
ऑरेंज झोन
तर रत्नागिरी, रायगडसह १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये ; अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, भंडारा, बीड, लातूर या जिल्ह्यांचा ऑरेंज झोनमध्ये सहभाग आहे
ग्रीन झोन
सिंधुदुर्गसह केवळ ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये ; उस्मानाबाद, वाशीम, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे
www.konkantoday.com