
भेलसई येथे हातभट्टीवर पोलिसांची कारवाई
खेड : तालुक्यातील भेलसई गावातील गंगवाडीत धाड टाकून पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष काशिराम कदम याला ताब्यात घेतले. घराच्यासमोरील अंगणात गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना ही कारवाई केली. यावेळी 1510 रुपये किंमतीची 35 लिटर दारू जप्त करण्यात आली. याबाबत तक्रार किरण प्रभाकर चव्हाण यांनी खेड पोलिस ठाण्यात केली आहे.