विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना मंजूर झालेल्या निधीचे वितरण करावे आमदार शेखर निकम यांची मागणी
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीचे वितरण करण्यात यावे व तसा वितरणाचा शासन आदेश निघावा यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. शिवाय याविषयी अर्थ व शिक्षण सचिवांनादेखील पत्रव्यवहार केला आहे.
राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना हक्काचा पगार मिळावा यासाठी आ.शेखर निकम जातीने प्रयत्न करीत आहेत.
www.konkantoday.com