
दापोलीत पाच जणांच्या उपस्थितीत चक्क घराच्या गॅलरीत पार पडला विवाह सोहळा
दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष भाऊ मोहिते यांच्या मुलाचा विवाह पाच जणांच्या उपस्थितीत चक्क घराच्या गॅलरीत साधेपणाने पार पडला सध्या सर्वत्र जिल्ह्यात लॉक डाउन असल्याने लग्नात सोहळ्यात अत्यंत कमी उपस्थिती ठेवणे बंधनकारक आहे परंतु अनेक वेळा नियम मोडून लग्न सोहळ्यात जास्त लोक गोळा केल्याची उदाहरणे आहेत
दापोलीचे भाऊ मोहिते यांचा मुलगा अनिरुद्ध यांचा विवाह गिम्हवणे येथील सुनील महाडिक यांची कन्या सेजल हिच्या बरोबर पार पडला हा विवाह साध्या वातावरणात पाच लोकांच्या उपस्थितीत मास्क लाऊन अंतर राखून पार पडला लग्न सोहळ्याला बेंडबाजा ना लाऊडस्पीकर होता पाहुण्यांनाही निमंत्रित करण्यात आले नव्हते लग्न सोहळा पार फंडावर वधूवर घरात येत असतांना इमारतीतील सर्व लोकांनी घरातून पुष्पवृष्टी केली लग्न सोहळ्यात वाचलेले पैसे सामाजिक कामासाठी देण्याचा निर्धार या वेळी मोहिते यांनी व्यक्त केला आहे
www.konkantoday.com