काेराेनामुळे रत्नागिरी कारागृहातील कैद्यांवरही सुरक्षितेसाठी बंधने आली
काेराेनामुळे सर्वसामान्य माणूस सध्या घरात बसून सक्तीच्या कैदेत आहे मात्र रत्नागिरी कारागृहातील खरोखर कैदेत असलेल्या अनेक कैद्यांवर ही आता अनेक बंधने आली आहेत
रत्नागिरी कारागृहात कच्चे व पक्के असे म्हणून १५०कैदी आहेत पूर्वी या कैद्यांची दिनचर्या वेगळी होती एकत्र येऊन बराकमध्ये पाणी भरणे नाष्टा व जेवणासाठी साठी कैद्यांना एकत्र बोलवण्यात येत होते आता मात्र काेराेनामुळे सगळ्या दिनचर्येत बदल झाला आहे बराकीत पाणी भरण्यासाठी व आंघोळीसाठीआता एकानेच सुरक्षित अंतर ठेवून येण्यास बंधनकारक करण्यात आले आहे नाष्टा व जेवणासाठी देखील सुरक्षित अंतराचा नियम ठेवण्यात आला आहे पूर्वी कैद्यांना आपल्या नातेवाईकांना भेटता येत होते आता त्यावर बंधने आली आहेत याशिवाय सर्व कैद्यांना मास व हँडवॉश वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे अर्थातच जेलमधील कैद्यांच्या सुरक्षितेसाठी व त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी या काही कडकबंधने घालून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे
www.konkantoday.com