करोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेची दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती
करोनाच्या प्रतिबंधासाठी बाहेरुनआलेल्यांवर लक्ष ठेवणे, त्यांची तपासणी करणे आणि गावागावात सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे यासाठी जिल्हा परिषदेने दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे सारे रक्षक जिल्ह्यातील गावांमधील वाडी-वस्त्यांवर सज्जतेने काम करत आहेत. आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविकांचा त्यात समावेश आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नियमित १२१ डॉक्टर्स, ४२ औषध निर्माण अधिकारी, १८ आरोग्य पर्यवेक्षक, १५० आरोग्य सहाय्यक, २३५ आरोग्य सेवक, ५६ आरोग्य सहाय्यिका, ३४५ आरोग्य सेविका, १०१ कंत्राटी आरोग्य सेविका, ९४ अंगणवाडी पर्यवेक्षक, दोन हजार ७७६ अंगणवाडी सेविका, दोन हजार १०० मदतनीस, ६९ गटप्रवर्तक, एक हजार २८५ आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ६३ कर्मचारी, ३५ ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ७६४ ग्रामसेवक, ३४४ तलाठी, एक हजार ३७० ग्रामपंचायत कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या इतर विभागांमधील ३० कर्मचाऱ्यांचा या फौजेत समावेश आहे
www.konkantoday.com