औद्योगिक क्षेत्रातील लहान व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी
तालुक्यातील मिरजोळे आणि झाडगाव औद्योगिक क्षेत्रातील लहान व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी लघुउद्योग संघटनेतर्फे करण्यात आली आहे. लहान उद्योगातील कामगार आस्थापना अल्प असल्यामुळे त्यांना दररोज येऊन-जाऊन काम करण्याची मुभा मिळावी अशी मागणी केली असून ते निवेदन स्मॉल स्केल इंडस्ट्रीज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
हे निवेदन देताना प्रभारी उपाध्यक्ष मरिनर दिलीप भाटकर, सचिव राजेंद्र सावंत, सदस्य दिगंबर मगदूम, प्रादेशिक अधिकारी श्री. पडळकर साहेब व उप अभियंता बी. एन. पाटील उपस्थित होते.
www.konkantoday.com