ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.ऋषी कपूर चित्रपट सृष्टीतील दाेन पिढ्यांदरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com