
अत्यावश्यक सेवेत काम करणा-या एसटी कर्मचार्यांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी
बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी काही पोलीस कर्मचारी मृत्यु पावले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणा-या एसटी कर्मचार्यांना ५० लाखाचे विमा कवच तातडीने देणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनी केली.
कोरोना विषाणूमुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन झाले आहे. परिणामी, सर्व वाहतूक बंद आहे. राज्यात एसटीची सेवा बंद आहे. मात्र मुंबई महानगरात एसटी महामंडळाची अत्यावश्यक सेवा सुरू आहे.
www.konkantoday.com