
सिंधुदुर्ग वर पुन्हा कोरोनाचे संकट एक पंधरा वर्षाची मुलगी काेराेनापॉझिटिव
कोरोना मुक्त असलेल्या सिंधुदुर्ग वर पुन्हा कोरोनाचे संकट ओढवले असून मुंबई आलेली एक पंधरा वर्षाची मुलगी पॉझिटिव निघाली आहे.
ही मुलगी २० एप्रिल ला मुंबईहून सिंधुदुर्गात आली होती. तिला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. तिचा अहवाल पॉझिटिव आला आहे. यामुळे चिंता वाढली असून मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांना खरोखरच कोकणात प्रवेश द्यावा यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यामुळे सिंधुदुर्ग हादरला आहे.
www.konkantoday.com