रत्नागिरी नळपाणी योजना काम त्वरित चालू करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेवून काम सुरु करा – अॅड दीपक पटवर्धन
दि.२० एप्रिल नंतर अनेक अत्यावश्यक कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पाणी योजना ही अत्यावश्यकच आहे. मात्र रत्नागिरी नगरपरिषदेने पाणी योजनेचे काम सुरु करण्यासाठी स्वारस्थ दाखवलेले नाही. पाणी योजना मंजुरी निधी उपलब्धता याची अडचण नसताना केवळ नकारात्मक मनोवृत्ती व
इच्छाशक्तीच्या अभावामुळे पाणी योजनेचे काम अत्यावश्यक असतांना सुरु झालेले दिसत नाही. कोरोना महामारी सुरु होण्यापूर्वी केवळ आठ दिवसाचे काम शिल्लक आहे अशा बातम्या होत्या. मात्र नकारात्मक मनोवृत्तीला कोरोना साथीने मदत केल्याने रत्नागिरीकरांचा उन्हाळा पाण्याच्या दुर्भिक्षात जाणार असे दिसते.
अत्यावश्यक कामे करण्यासाठी परवानगी असेल तर रत्नागिरी पाणी योजनेचे काम का सरु होऊ शकत नाही. तांत्रिक ज्ञान असलेली माणसे पर
जिल्ह्यात असतील तर खास परवानगी घेऊन त्यांना रत्नागिरीत आणता येऊ शकते. तसा प्रस्ताव पाठवून त्याला मंजुरी मिळू शकते. योग्य काळजी घेत पाणी योजनेचे काम मार्गी लावून जनतेचा पाणी प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे आहे.
आठ दिवसांचेच काम शिल्लक असेल तर पाण्या सारख्या विषयासाठी रत्नागिरीतील नागरिकांना का ताटकळत ठेवले जात आहे की याजोगे पाणी टँकर पुरवठ्यावर मोठा खर्च करून हितसंबंध जोपासण्याचे षडयंत्र आहे असाही प्रश्न पडू शकतो, असा परखड प्रश्न अॅड. दीपक पटवर्धन यांनी उपस्थित केला असून पाणी योजनेचे
काम तात्काळ सुरु करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा अशी मागणी मुख्याधिकारी नगर परिषद यांना पत्र लिहून अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.