रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी निवळी , संगमेश्वर,चिपळूणसह रत्नागिरी शहरातही पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात चिपळूण संगमेश्वर सह रत्नागिरी जवळील निवळी परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली चिपळूण भागात परत आज सांयकाळी वादळी पावसाने हजेरी लावली जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळला चिपळूण परिसरातील बहुतांशी गावात पाऊस पडला.चिपळुनला सलग तिसर्‍यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून त्यामुळे आंबा पिकावर परिणाम होणार आहे संगमेश्वर परिसरात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली रत्नागिरीजवळील निवळीभागातही पावसाच्या सरी कोसळल्या
रत्नागिरी शहरात कालपासून मोठ्या प्रमाणावर उष्म्यात वाढ झाली होती चार वाजणेच्या सुमारास संपूर्ण वातावरण बदलून गेले वादळी वाऱ्यासह पावसाळी वातावरण निर्माण झाले होतेशहर परिसरात मात्र पावसाने किरकोळ हजेरी लावली काही भागात रस्ते ओले झाले होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button