मुंबई पुण्यातील चाकरमान्यांना गावी आणण्याचा निर्णय चार दिवसांत होणार -आमदार भास्कर जाधव
मुंबई पुण्यातील चाकरमान्यांना गावी पाठविण्याचा बाबत आपण पाठपुरावा केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आशिषकुमार सिंग तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण चर्चा केली आहे तेव्हा चाकरमान्यांनाे बॅगा भरुन ठेवा सरकारकडून येत्या चार दिवसांत गावी पाठविण्याचा निर्णय होईल अशी आशा आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली मुंबई पुण्यात काेराेनामुळे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी एसटीचा पर्याय असू शकेल चाकरमान्यांची मुंबईतून निघताना आणि गावात आल्यावर नियमित आरोग्य तपासणी केली जाईल गावात चाकरमान्यांना होणाऱ्या विरोधाबाबत आपण आपल्या मतदारसंघात दौरा करीत आहे यामुळे अनेक गावे चाकरमान्यांना स्वीकारण्यास तयार होत आहेत ज्या गावात विरोध होईल त्या गावात चाकरमान्यांना एकत्रित विलगीकरणात ठेऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल
असेही जाधव यांनी सांगितले
www.konkantoday.com