
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं.मंगळवारी त्यांना कोलोन इन्फेक्शनमुळे इस्पितळात भरती करण्यात आलं होतं.बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.गेल्या काही वर्षांपासून इरफान आजारी होता. २०१७ मध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला होता. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. गेल्या वर्षी २०१९ मध्ये तो भारतात परतलाही होता.