पोमेंडी येथील ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

सध्या भारतात सर्वजण कोरोना विरुद्ध लढाई लढत आहेत केंद्र शासन व राज्य शासन युद्धपातळीवर काम करीत आहे या लढाईत आपला सहभाग असावा या हेतूने प्रशासनाला मदत म्हणून पोमेंडी खुर्द येथील शेतकरी आणि ग्रामस्थ यांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला सध्या सर्व व्यवसाय ठप्प असल्यानेअडचणीत असून देखील आपल्या परीने मदत करण्याचे निश्चित करण्यात आले पोमेंडी खुर्द येथील शेतकरी व ग्रामस्थ यांनी आपल्या परीने शक्य असेल तेवढी रक्कम गोळा करण्याचा निर्धार केला आणि त्याप्रमाणे सर्वांच्या सहकार्यातून ३२हजार ५४१हित जितका निधी जमा झाला हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला स्वतः आर्थिक संकटात असताना देखील या सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपली देश व राज्यापेक्षा कोणी मोठा नाही ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिले या उपक्रमाबद्दल पोमेंडीकर ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button