कुंभार्ली घाटातून २मे पर्यंत भाजीपाला, कोंबडया, बकऱ्या आणि अंडी यासह खाद्यपदार्थ वाहतूक बंद
रत्नागिरी जिल्हयालगत असणाऱ्या सातारा जिल्हयातील कराड तालुक्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. या भागातून फळे, भाजीपाला, कोंबडया, बकऱ्या आणि अंडी यासह खाद्यपदार्थ वाहतूक कुंभार्ली घाटातून चिपळूण तालुक्यात होते. कोरोना विषाणूचा संसर्ग या वाहतुकीमुळे होण्याची शक्यता असल्याने २मे २०२० पर्यंत या घाटातून या स्वरुपाची सर्व वाहतूक रोखण्याचा आदेश जारी करण्यातआला आहे.
www.konkantoday.com