
भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात कोसळली दरड
धुवाधार पर्जन्यवृष्टीमुळे भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील श्री वाघजाई देवी मंदिराजवळील उंच कड्याचा भाग गुरूवारी सकाळच्या सुमारास रस्त्यावर कोसळला. या दरडीमुळे संरक्षक कठडा तुटला असून काही काळ वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान कोणतेही वाहन मार्गस्थ होत नव्हते. याचमुळे मोठा अनर्थ टळला.वरंधा घाटातील मार्गाच्या दुरूस्तीसाठी गेल्या २ महिन्यापासून मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मेगाब्लॉकमुळे वाहतुकीसाठी माणगांव, निजामपूर, ताम्हिणी घाट व पोलादपूर, महाबळेश्वर, वाई ते पुणे-बेंगलोर द्रूतगती महामार्गाचा अवलंब करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये खर्चूनही घाटातील रस्त्याची दुरूस्ती करूनही दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे. सद्यस्थितीत एसटी बस वगळत्या अन्य वाहने मार्गस्थ होत आहेत. www.konkantoday.com