राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ

राज्यातील मुदत संपत असलेल्या आणि निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी सहकारी संस्थांची संचालक मंडळ निवडणूक होईपर्यंत पदावर कायम राहतील. त्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ नजीकच्या काळात पूर्ण होत आहे, त्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणे आवश्यक होते. मात्र लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button