
पित्रे फाउंडेशन व आकार आर्गनायझेशनकडुन देवरुख पोलीस स्टेशनला चार बॅरीकेटस्
कोरोना मुळे देवरुख पोलीसांना बंदोबस्त वाढवावा लागला आहे ठिकठिकाणी चेकपोस्ट व गावागावातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे वाहन चेकींग व तपासासाठी बॅरीकेटस् कमी पडत होते. यासाठी उद्योजक अजय पिञे यांच्या पिञे फाॅंउडेशन व आकार आॅर्गनायझेशन कडुन मजबुत अशी ४ बॅरीकेटस् देवरुख पोलीस स्टेशनला दिली.देवरुख पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्ष सौ.निशा जाधव यांच्या ताब्यात ही बॅरीकेटस् देण्यात आली
यावेळी तहसीलदार सुहास थोरात, आकारचे कार्याध्यक्ष निलेश चव्हाण, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचे राज्यसंघटक वैजनाथ जागुष्टे, स्मिथ अॅन्ड नेफ्युचे मंगेश प्रभुदेसाई, पोलीस दलाचे किशोर जोयशी, अनुराग कोचिरकर, डाॅ.सुर्यवंशी,सागर संसारे, भाउ शिंदे, रुपा नलावडे, दिप्ती भिडे आदी उपस्थित होते. रत्नागिरी पोलीस दलातर्फे जाधव यांनी पिञे फाॅंउडेशनचे आभार मानले
www.konkantoday.com