जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीकडून चाफेरी गावातील तब्बल २७५ कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
लॉकडाऊनच्या कालावधीत जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत या संकटकाळात चाफेरी गावातील तब्बल २७५ कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले एक महिन्यापेक्षा अधिक काळ लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले आहेत. अशावेळी जयगड पंचक्रोशीतील चाफेरी गावातील ग्रामस्थांसाठी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीने दिलासादायक कामगिरी केली आहे.लॉकडाऊनच्या काळात चाफेरी गावातील तब्बल २७५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली यावेळी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे सुधीर तेलंग, सुदेश मोरे, योगिता महाकाळ, जेएसडब्ल्यू एनर्जीचे जाधव, चाफेरी सरपंच महेश चौगुले, उद्योजक नंदू केदारी, विनोद चौगुले, वामनकाका पालकर, रणजित चौगुले, जितू चौगुले आदी उपस्थित होते.
www.konkantoday
com