
चाकरमान्याच्या प्रश्नावर काही जण राजकारण करत आहेत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल -ना.उदय सामंत
मुंबईस्थित असलेल्या चाकरमान्यांना आपल्या मूळ गावी येण्याची इच्छा आहे.याबाबत सरकार चर्चा करून धोरण निश्चित करणार आहे. प्रत्येकाला सुरक्षितरित्या आपल्या मूळ गावी आणतानाच येथील जनतेची सुरक्षा अबाधित राहील यासाठी आवश्यक उपायोजना करण्यात येणार आहेत. परंतु याचे राजकारण काहीजण करत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडला जाईल असा इशाराही ना.उदय सामंत यांनी दिला. अभ्यासांती चाकरमान्यांना कोकणात परतण्याचा निर्णय शासन जाहीर करणार असल्याचे सांगत चाकरमान्यानी घाबरून जाऊ नये असे आवाहनही ना. सामंत यांनी केले आहे.
www.konkantoday.com