गेले महिनाभर बंद असलेल्या वाशिष्ठी पुलाचे काम तातडीने सुरू
गेले महिनाभर वाशिष्ठी पुलाचे काम बंद होते. मात्र, आता शासनाचे आदेश प्राप्त होताच तातडीने या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. जुना वाशिष्ठी पूल धोकादायक बनल्याने नवीन पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना महामार्ग विभागाकडून करण्यात आल्या आहेत.परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. त्यामुळे शासनाचे आदेश प्राप्त होताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या
www.konkantoday.com