कोरोनामुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम स्वरूपानंद पतसंस्थेच्या अर्थकारणावर होवू न देण्यासाठी योग्य नियोजन – अॅड दीपक पटवर्धन
मार्च अखेरीस ९९.८९% इतकी विक्रमी वसुली सर्व कर्जदारांच्या सहकार्याने स्वामी स्वरूपानंदने केली. लॉक डाऊन असतानांही ९९.८९% वसुली हे योग्य कर्जदारांना केलेले कर्ज वितरण याचे द्योतक आहे. ५ कोटी १५ लाख निव्वळ नफा, २०१ कोटींच्या ठेवी त्यातून ८६ कोटींची केलेली बँक गुंतवणूक २८ कोटींचा स्वनिधी अशी भक्कम आर्थिक स्थिती ही सर्व गुंतवणूकदारांना, ठेवीदारांना आश्वस्त करणारी आहे. नियमित पाठपुरावा करत केलेली वसुली त्यातील शिस्त आणि संस्थेच्या या कार्यपद्धतीला कठीण प्रसंगातही कर्जदारांची साथ हे संस्थेचे शक्तीस्थान झाले आहे असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.
आज आर्थिक क्षेत्रात सर्वत्र रोख तरलता (लिक्विडीटी ) चा प्रॉब्लेम आहे अस म्हटल जात. मात्र स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आपले सर्व व्यवहार प्रमाणबद्ध पद्धतीने केले असल्याने स्टॅटयुटरी गुंतवणूक, अन्य निधींची पूर्ण गुंतवणूक तसेच दैनंदिन रोख तरलता याबाबी सोडूनही आज अखेर १४ कोटींची रोख तरलता संस्थेने राखली आहे.
संस्थेची १४० कोटीं ६७ लाखांची येणे कर्जाची रक्कम आहे. १४० कोटी ६७ लाखांपैकी ७० कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज असून ४९ कोटी ४३ लाखांचे कर्ज हे तारणी कर्ज आहे. नोंदणीकृत गहाणखते २२५ गहाणखते करून तारणी कर्जाचे वितरण केले आहे. जामिनकी कर्ज, पगार कर्ज २१ कोटींची आहेत. म्हणजेच योग्य तारणी कर्जाचे प्रमाण संस्थेने सातत्याने राखले आहे.
नियमित कर्ज परतफेड करणारे कर्जदार यांना माहे सप्टेंबर पर्यंत निर्णय घेवून काही व्याज सवलत देण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे. संस्थेच्या निव्वळ नफ्याची वर्गवारी करतांना याबाबत निर्णय केला जाईल.
१ एप्रिल पासून २९ एप्रिल पर्यंत संस्थेकडे १ कोटी ९ लाखांच्या ठेवी जमा झाल्या. तर १ कोटी ९८ लाखांचा कर्जव्यवहार ही झाला आहे. लॉक डाऊन च्या या २९ दिवसात संस्थेकडे रु.४३ लाख कर्ज वसुली प्राप्त झाली. चालू महिन्यातही संस्थेचा व्यवसाय हा संस्थेचे मासिक खर्च सहज भागविल एवढा झाला आहे.
लॉक डाऊन मुळे अर्थकारण ठप्प होत आहे नवे कर्ज वितरण त्याची मागणी कमी राहणार आहे. नवे कर्ज वितरण धोकादायक ठरू शकते. या सर्वाचा विचार करून संस्थेने कर्ज धोरण, कर्ज निकष नव्याने ठरवले आहेत. सातत्यपूर्ण व्यवहार करणाच्या ग्राहकांना अग्रक्रमाने कर्ज पुरवठ्याचे धोरण ठेवले आहे. ठेवींवरचा बँकाचा दर कमी होवून ६.५०%, ६.७५% पर्यंत स्थिरावत आहे याचा विचार करून सुरक्षीततेला संपूर्ण प्राधान्य देण्याच्या संस्थेच्या धोरणानुरूप आपले ठेव व्याजदर ८ % ते ८.१५% पर्यंत निश्चित केले आहेत. ठेवीदार संस्थेवर विश्वास ठेवतो. ठेवीदारांच्या ठेव रक्कमेची सुरक्षितता हा सर्वाच्च प्राधान्याचा मुद्दा करून संस्थेने आपले ठेव धोरण आखले आहे. ठेव कर्जांबाबतही स्वतंत्र सुविधा ठेवीदारांना उपलब्ध करत आहोत.
संस्थेची २९ वर्षांची विश्वासार्ह वाटचाल प्राप्त झालेला अनुभव सर्वदूर निर्माण झालेले नेटवर्क या सर्वांचा वापर करत अर्थक्षेत्रातली आव्हाने पेलण्यास स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सज्ज झाली आहे. २५० कोटींचा ठेव टप्पा १७५ कोटींचा कर्ज टप्पा हे उद्दीष्ट ठरवून संस्थेने आपले नवीन वर्षातील कामकाज सुरु केले आहे. संस्थेची विश्वासार्हता, ग्राहक सेवा ठेवीदारांच्या ठेव रक्कमेची सुरक्षितता ही सुनिश्चित करणारी भक्कम आर्थिक आकडेवारी यामुळे स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अधिक भक्कमपणे अग्रेसर होईल असे आश्वासक प्रतीपादन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.