
ऑनलाइन रिचार्ज पडला महाग ,खात्यातील सर्व रक्कम साफ
खेड एमआयडीसी पुष्कर केमिकल्स मध्ये काम करणारा प्रदीप दाेडेकर याने अठ्ठेचाळीस रुपयांच्या ऑनलाइन रिचार्ज मारला परंतु तो झाला नाही म्हणून त्याला दुसरी लिंक देण्यात आली त्या लिंकवर गेले असता त्याच्या खात्यातील असलेले पंधरा हजार रुपयेही अज्ञाताने ऑनलाइन काढून घेऊन त्याची फसवणूक केली.प्रदीप यांचा रिचार्ज संपल्याने त्याने गुगल पे अॅपद्वारे ४८रुपयांच्या रिचार्ज मारला परंतु तो झाला नाही म्हणून त्याने व्होडाफोन कस्टमर केअरला फोन केला त्यांनी गुगल पे कस्टमर केअरला फोन करायला सांगितले गुगल पे कस्टमर केअरने त्यांना एक ऑनलाइन लिंक दिली त्यावर विचारलेली माहिती फिर्यादी देत गेले त्यानंतर फिर्यादी प्रदीप हे लिंकमधून बाहेर आल्यावर त्याच्या खात्यात असलेले १५हजार ६९९रुपये कोणी अज्ञाताने ऑनलाइन गैरव्यवहार करून काढल्याचे आढळून आले आपली फसवणूक झाल्याचे कळताच प्रदीप याने खेड पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com