घरासमोर भांडण करू नका असे सांगणार्‍याला मारहाण, एकजण जखमी

आपल्या घरासमोर भांडणे करू नका असे सांगायला गेलेल्या राजेश सुधाकर नेने याला मारहाण करून डोक्यात दगड मारून जखमी केल्याच्या आरोपावरून संदीप विटकरी राहणार क्रांतीनगर याच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार रत्नागिरी शहरातील स्टेट बँक कॉलनीच्या मागे शिव स्मित अपार्टमेंटच्या बाजूला घडला यातील फिर्यादी राजेश नेने यांच्या घरासमोर गेटजवळ ट्रक उभा होता व त्यामध्ये दोन माणसे मोठमोठ्याने भांडत होती व आपापसात घाणेरड्या शिवीगाळ करत होते राजेश यांचा मुलगा अथर्व घरात अभ्यास करीत होता त्यामुळे राजेश हे बाहेर आले व त्यांनी भांडणाऱ्यांना तुम्ही इथे भांडू नका असे सांगितले याचा राग येऊन आरोपी संदीप विटकरी याने राजेशच्या अंगावर जाऊन तेथे जमिनीवर असलेला दगड उचलुन राजेशच्या डोक्यात मारून त्याला दुखापत व शिविगाळ केली यात राजेश हा किरकोळ जखमी झाला याबाबत आरोपीविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button