
कोकणवासियांनी काेराेनातही जपली माणुसकी ,नातेवाईक येऊ शकत नसल्याने गावकऱ्यांनी केले वृद्धेवर अंत्यसंस्कार
कोराेनाच्या भीतीमुळे आज माणूस माणसांपासून लांब होत आहे पण कोकणवासियांनी आपली माणुसकी या काळातही जपली आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा इन्सुली येथे राहणाऱया गोपिका गावडे या ८८ वर्षांच्या महिलेचे वृद्धापकाळामुळे निधन झाले गोपिका यांचा मुलगा केशव सध्या दक्षिण आफ्रिकेत राहतात तर त्यांची सून आणि नातू मुंबईत डोंबिवलीत राहतात गोपिका बाईंचे निधन झाल्याचे गावकऱ्यांनी सर्वांना कळविले परंतु सध्याच्या लॅाक डाऊनमुळे कुणीही अंत्यसंस्काराला येणे शक्य नव्हते शेवटी अंत्यसंस्कार कुणी करायच्या प्रश्न निर्माण झाला गावचे पंचायत समितीचे सदस्य राणे यांनी पुढाकार घेतला त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आपल्या घरातील सदस्य गेले असे समजून गोपिकाबाई यांचे अंत्य संस्कारांपासून सर्व कार्य केले राणे यानी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक करण्यात येत आहे शेवटी माणूसच माणसाला उपयोगी पडतो या घटने मुळे दिसुन आले
www.konkantoday.com