आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतसह परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्याच्या मागवण्याच्या मागण्या केल्या जाऊ शकतात. याशिवाय उद्योगांनादेखील दिलासा देण्याची मागणीदेखील केली जाऊ शकते. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान कार्यालयातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून राज्यांमधल्या स्थितीचा आढावा घेतील.देशात लागू असलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याचा केंद्राचा विचार आहे
www.konkantoday.com