मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे कामाला सुरूवात
लॉकडाऊनमुळे मार्चपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले होते. या कामासाठी आलेले परराज्यातील कामगार साईटच्या जवळच राहत होते. काही आधीच गावी गेले होते. पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणाची कामे सुरू करण्याचे आदेश केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर रस्त्यांची जास्तीतजास्त काम पाऊस सुरू होण्यापूर्वी करा अशा सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २६६ किमीच्या चौपदरीकरणाचे काम लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. केंद्र शासनाकडून रस्ते कामांना शिथिलता मिळाल्यानंतर निकषांचे पालन करत महामार्गावरील सहापैकी चार टप्प्यातील १७८ किमीच्या कामाना सुरवात झाली. सुमारे चाैदाशे कामगार कार्यरत झाले त्यांची निवास व्यवस्था कामाच्या ठिकाणी करण्यात आली आहे.
www.konkantoday.com