महाराष्ट्रातील मद्याची दुकाने उघडायला भाजपकडूनही विरोध

राज्यात मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, या मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपकडूनही विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत महाराष्ट्रातील देशी आणि विदेशी मद्याची दुकाने सुरु होता कामा नये, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ही दुकाने सुरु झाली तर मद्य विकत घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडेल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होईल. यासोबतच काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button