
कोरोनाने राज्य पोलीस दलातील दुसरा बळी घेतला
कोरोनाने राज्य पोलीस दलातला आज रविवारी दुसरा बळी घेतला आहे. यात वाकोला पोलीस पाठोपाठ मुंबईतील ५३ वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे राज्यभरात कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com