अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्वामध्ये देव आहे–मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज देशवासियांची संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात सहकार्याबद्दल सर्वधर्मियांनांचे आभार मानले आहेत. आपले सण आपापल्या घरात राहूनच साजरे करा. आता रमजानचा महिना आहे. घरात राहूनच नमाज पडा अशी विनंती व्यक्त केली आहे.देव हा आता मंदिरात नाही तर संयमात आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांमध्ये देव आहे. सर्व कोरोना योद्धांचा आदर करा. ते खूप तणावाखाली काम करत आहेत.कोरोनामुळे २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. तसेच रूग्णसंख्येचा गुणाकार आपण रोखला आहे. कोरोनाचं हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं.
नितीन गडकरींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनापासून आभार मानले आहेत. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लोकं एकत्र आलोत. राजकारण टाळण्याचा सल्ला नितीन गडकरींना दिला आहे. अजूनही काही जण राजकारण करत आहेत. पण ठिक आहे त्यांना राजकारण करू द्या.
३ तारखेनंतर मुभा देण्याचा विचार केला जाणार आहे. मात्र जिल्ह्यांच्या सीमा उघडल्या जाणार नाही. जिल्ह्यात काही उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र गर्दी टाळा. सोशल डिस्टिन्शिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत
www.konkantoday.com