हॅकरचा प्रयत्न अयशस्वीराजापूर अर्बन बँकेचे मोबाईल अ‍ॅप हॅक करून लाखाे रुपये हस्तांतरित करण्याचा हॅकरचा प्रयत्न अयशस्वी

लॉकडाऊन आणि सुट्टीचा फायदा उठवत अज्ञात हॅकरने राजापूर अर्बन को. ऑप. बँकेचे मोबाईल अ‍ॅप हॅक करून राजापूर शाखेतील एका खातेदाराचे बँक खाते हॅक करून ६७लाख २२ हजार ३१६ रुपये इतकी रक्‍कम हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न रोखण्यात बँकेला यश आले आहे, ही बाब लक्षात येताच बँकेने तत्काळ हॅकरने ज्या खात्यामध्ये ही रक्‍कम हस्तांतरित केली ती सर्व खाती गोठवल्याने मोठा आर्थिक धोका टळाला आहे. बँकेने याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गुरूवारी अशा प्रकारे हॅकरने चंद्रपूर येथील एका खात्यात वर्ग केलेले 1 लाख 70 हजार रूपये बँकेकडे जमा देखील झाले आहेत. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेने दाखविलेल्या या तत्परतेमुळे बँकेचे आर्थिक नुकसान टळले आहे. दि. 20 एप्रिल रोजी हा प्रकार घडला असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी राजापूर अर्बन बँकेच्या राजापूर शाखेचे शाखाधिकारी रमेश काळे यांनी अज्ञाताने बँकेवर सायबर हल्‍ला केल्याची फिर्याद राजापूर पोलिसात दाखल केली आहे. हॅकरने वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या बँकांमधील १६खातेदारांच्या खात्यांमधून सुमारे ६७ लाख २२ हजार ३१६ रूपये हस्तांतर केले आहेत. मात्र, यातील सुमारे ५० ते ६० लाख रूपये हे बँकेने तत्काळ सर्व खाती गोठविल्याने जमा असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button