रत्नागिरी वासीयांच्या शिस्तीमुळे कोरोना मुक्ती साध्य-ॲड अनिल परब

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठरलेल्या रत्नागिरी जिल्हयात प्रशासन आणि नागरिकांनी शिस्तीने काम करुन कोरोना मुक्ती मिळवली आहे. येणाऱ्या काळात ही टिकवूया. या शब्दात राज्याचे परिवहन मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.
कोरोना मुक्तीच्या या लढयाला सर्व सहभागी यंत्रणा, प्रशासन, पोलीस दल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी , ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे अधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी कोरोना मुक्तीसाठी परिश्रम घेतले. या कारोना योध्दांचे काम मोलाचे आहेत असे परब यांनी आपल्या व्हीडीओ संदेशात म्हटले आहे.
मंत्रीमंडळातील सहकारी मंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व यंत्रणेने केलेली कामगिरी मोलाची आहे.
नागरिकांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल आभार, पुढील काळातही नागरिकांनी घरात राहून जिल्हा कोरोनामुक्त राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री. परब यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button