
महाराष्ट्रात दुकानदारानी
राज्य सरकारांच्या निर्देशांची वाट पाहावी-दुकानदार संघटनेची भूमिका
केंद्र सरकारने शनिवारपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. लॉकडाऊनपुर्वीच दुकाने उघडण्याबाबत केंद्र सरकारकडून सुट देण्यात आली असली तर नियमांबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कडुन स्पष्ट निर्देश येत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याची भूमिका दुकानदारांनी घेतली आहे.रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली असली तरी राज्य सरकारांच्या निर्देशांची वाट पाहावी, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी केले आहे.
www.konkantoday.com