
हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा पोहोचला.
फळांचा राजा म्हणजे आांबा. वर्षातून चारच महिने हापूसची चव चाखता येते. मार्च महिन्यात आंब्याचा खरा सिजन सुरु होता. यंदा मात्र, ऐन थंडीतच हापूस बाजारात आला आहे.मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला आहे. कुणकेश्वर येथून देवगड हापूसची पहिली पेटी सांगलीला रवाना झाली आहे. सांगलीच्या बाजारात फळांचा राजा दाखल झाला आहे. हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा पोहोचला आहे. कुणकेश्वर येथील शेतक-याचा एक डझनच्या पेटीला अडीच हजार रुपये भाव मिळालाय. सध्या दोन पेट्यांची आवक झालीये. सांगलीमध्ये देवगड हापूसची मागणी वाढली आहे.
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरची वाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या असून या पाठविलेल्या देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला 2500 इतका दर मिळाला असल्याचेत्यांनी सांगितले.