गेला दीड महिना आपल्या कुटुंबापासून दूर राहून शासकीय रुग्णालयातील विशेष विभागातील कर्मचारी बजावत आहेत आपले कर्तव्य
आज कित्येक दिवस आपण लाॅक डाऊन मुळे घरात बसून आहाेतत्यामुळे अनेकांच्यात चिडचिड निर्माण झाली आहे असे असले तरी आपणा सोबत आपले अख्खे कुटुंब आहे पण आज अशीही काही लोक आहेत की जे आपल्या कुटुंबा पासून गेले दीड महिना लांब राहून आपले कर्तव्य बजावत आहेत रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या विशेष विभागातील वीस कर्मचारी आपल्या कुटुंबापेक्षा कर्तव्याला प्राधान्य आहेत
रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनाने ,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या स्वतःच्या मेहनतीमुळे रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त होत आहे नामदार उदय सामंत हे प्रशासनाच्या मागे ठामपणे उभे आहेत काेराेनाही थेट लढाईत लढा देत आहेत तेआरोग्य कर्मचारी रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी नर्स ,वॉर्ड बॉय, शिपाई, वॉचमन पर्यंत प्रत्येक जण आपले कर्तव्य बजावत आहे रत्नागिरी शासकीय रुग्णालय हे कोरोना रुग्णालय जाहीर करण्यात झाल्यानंतर काेराेणासाठी असलेल्या विभागात वीस परिचारिका काम करीत आहेत यातील अनेकांना लहान मुले देखील आहेत पण ते सध्या कुटुंबात परतू शकत नाहीत गेले दीड महिन्या पासून ते कुटुंब पासून लांब आहेत कोरोना सारख्या लढय़ात ते आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत ते स्वतः कुटुंबापासून लांब राहून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवत आहेत शेवटी तीही माणसे आहेत त्यांनाही कुटुंबाची, आपल्या लहानग्या मुलांची आठवण येणारच मग ते मोबाइलच्या माध्यमातून कुटुंबाच्या संपर्कात राहतात त्यावरूनच एकमेकांची ख्याली खुशाली विचारत आहेत एकमेकांना धीर देत आहेत काेराेनाला हरवण्याच्या लढाईत यांचा मोलाचा वाटा आहे अशा या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कर्तृत्वाला रत्नागिरीकरांचा सलाम
www.konkantoday.com