सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून येणार्यांची संख्या कमी झाली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून येणार्यांची संख्या या एक-दोन दिवसात कमी झाली आहे. काही लोक परवानगी घेऊनच येत आहेत. मात्र, अशा प्रत्येकाची नोंद करून मुंबई आणि पुणे अशा ठिकाणाहून येणार्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
www.konkantoday.com