सहा महिन्यांच्या बाळाला कोरोना मुक्त होण्यासाठी आईचे दुधाचा झाला माेठा फायदा
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सहा महिन्यांच्या बाळाचा काेराेनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला.या छोट्या सहा महिन्याच्या बाळाला काही दिवसाआधी काेराेनाची लागण झाली हाेती बाळाला कोरोना झाल्याचे कळताच जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठे आव्हान होते विशेष म्हणजे या मुलाच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता बाळ सहा महिन्याचा असल्यामुळे त्याच्या बरोबर आईलाही जवळ ठेवणे जरुरीचे होते शेवटी रुग्णालयात एक वेगळा वॉर्ड बनवुन आई व बाळाला ठेवण्यात आले अशा परिस्थितीत मुलाला आईचे दूध मिळणे आवश्यक होते त्यामुळे बाळाच्या आईला जवळ ठेवून तिचे दूध बाळाला वेळोवेळी देण्यात येत होते आईचे दूध हे बाळाला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडले शासकीय रुग्णालयाने बालरोगतज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली बालरोगतज्ज्ञांचे खास पथकही या छोटय़ा बाळाच्या उपचारासाठी सज्ज ठेवले त्यांच्या देखरेखीखाली बाळावर उपचार झाले त्या सर्वांचा सकारात्मक परिणाम झाला बाळांनानेही
त्याला चांगला प्रतिसाद दिला बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली व बाळाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले व बाळ कोरोना मुक्त झाले जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने घेतलेल्या परिश्रमाला ही यश आले
www.konkantoday.com