रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्त जिल्ह्याच्या दिशेने ,निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल आता कोरोना मुक्त जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाले आहे सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे नंतरचे अहवाल आता निगेटिव्ह आल्याने जिल्हय़ात कोरोना मुक्त झाला आहे सध्या जिल्ह्यातून टेस्टिंगसाठी अहवाल जात असले तरी बहुतेक सगळे अहवाल निगेटिव्ह येत आहेत जिल्ह्यात काराेनाचे रुग्ण सापडल्यानंतर शहरातील राजिवडा साखरतर भाग सील करण्यात आला होता त्या ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले होते सध्या तीन तारखेपर्यंत लॉक डाउन जाहीर करण्यात आला आहे तरी देखील या भागातील हळूहळू शिथिल होण्याची शक्यता आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलिसांवरही ताण वाढला होता तोही ताण हळूहळू कमी होईल होईल रत्नागिरीचे आमदार व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाल्याबद्दल प्रशासनाचे व जनतेचे आभार मानले आहेत तसे जनतेने लॉक डाउन असेपर्यं आतासारखे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे
www.konkantoday.com