रत्नागिरीबाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला प्रारंभ
रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला काल प्रारंभ झाला आहे. तीन बागायतदारांनी आपले आंबे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते, तर पाच खरेदीदारांनी येथे हजेरी लावली. त्याठिकाणी बागायतदार आणि खरेदीदार यांच्यात दर निश्चित करुन खरेदी प्रक्रिया पार पडली. यावेळी पाच खरेदीदार उपस्थित होते. पाच आंबा पेटी, पाच क्रेट लुझ माल तर पिकलेल्या आंब्याचे बॉक्स ठेवण्यात आले होते. पाच डझनची पेटी सरासरी सतराशे रुपयांनी विक्रीला काढली गेली, तर सात क्रेटचे सात हजार रुपये आले. त्या एका तासामध्ये सुमारे पंधरा हजार रुपयांची खरेदी-विक्री झाली.
www.konkantoday.com