
आईच्या निधनाच्या धक्क्याने तरूणीचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड कांबळेलावगण येथे आईच्या निधनाचा शोक केल्याने तरूणीचा मृत्यू झाला. प्रियंका रवीकांत मालप (२४, रा. कांबळेलावगण, मालपवाडी) असे मृत तरूणीचे नाव आहे. ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली, अशी नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आहे. प्रियंकाची आई रूचिका मालप हिचे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यने निधन झाले. या घटनेचा प्रियंकाला धक्का बसल्याने ती तणावात होती. वेळेवर जेवण घेत नसल्याने तिला अशक्तपणा आला होता.
यंदा १९ जानेवारी रोजी आईचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर तिने जेवण सोडून दिले होते. घरातल्या मंडळींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र प्रियंका स्वतःला मानसिक धक्क्यातून सावरू शकली नाही. २२ जानेवारी रोजी तिला अत्यवस्थ वाटू लागले. त्यावेळी नातेवाईकांनी तिला उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता प्रियंकाला मृत घोषित केले.www.konkantoday.com