शासनाने बंदी उठवल्यानंतर मच्छीमारीला सुरुवात, मिरकरवाडा बंदरात उलाढाल सुरू
गेले कित्येक दिवस बंद असलेले मच्छीमारी काही अटी घालून शासनाने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर मिरकरवाडा बंदरातील काही बोटी समुद्रात मच्छीमारीला गेल्या होत्या या बोटींना गेदर ,काप, बांगडे अशी मासळी मिळाली आहे एका दिवसात अंदाजे आठ ते दहा टनाची उलाढाल होऊन हा माल केरळ व कर्नाटक,गोवा राज्यात पाठवण्यात आला यामुळे गेले काही दिवस थंडावलेला मच्छी व्यवसाय आता सुरू झाला आहे त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्यांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे
www.konkantoday.com