
लांजा तहसीलदार कार्यालयाच्या संगणक कक्षाला आग, तीन लाखांचे नुकसान
लांजामधील तहसीलदार कार्यालयातील संगणक कक्षाला अचानक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लॅपटॉप प्रिंटर व वायरिंग जळून खाक झाले या कक्षांमध्ये तलाठ्यांचे सातबारा संगणीकरणाचे काम चालते अचानक विद्युत प्रवाहाचा दाब वाढल्याने शॉर्टसर्किट झाले व आग लागली असा अंदाज आहे या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांसाठी जमा केलेला अन्नधान्याचा साठा ठेवण्यात आला होता त्यांचेही नुकसान झाले या आगीत एकूण तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचे कळते
www.konkantoday.com