परवानग्या जलदगतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यानीअधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले

लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सूट-सवलत देण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी लागू झाला. त्यानंतर नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या जलदगतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. यानुसार
प्रांत क्षेत्रात असणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील खाजगी बांधकामास परवानगी देणे आणि पावसाळ्यापूर्वीची तातडीची दुरुस्तीची कामे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मंजूरीसाठी पाठवता येतील.
जिल्हयात ग्रामीण क्षेत्रातील खाजगी बांधकामे तसेच पावसाळापूर्व दुरुस्तीचे अधिकार तहसिलदारांकडे असतील. लॉकडाऊनमधील सुट दिलेल्या आस्थापना, कंपनी व कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी यांना पासेस देणे तसेच वाहतूक परवान्याचेही काम तहसिलदारांकडे असेल.
वृत्तपत्रांच्या वितरणाबाबत सुधारित आदेश शासनाने जारी केले आहेत. बाधित क्षेत्र/ प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतरत्र वृत्तपत्रे घरोघरी वितरीत करता येतील. परंतु या कामात मास्क घालणे तसेच सॅनिटायझर चा वापर अत्यावश्यक करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button