
खा.विनायक राऊत वैद्यकीय तपासणी करूनच जिल्ह्यात फिरत आहेत-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते
सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत लॉकडाऊन असतानाही सिंधुदूर्ग दौऱ्यावर असल्याने काही विरोधी पक्षाची मंडळी खा राऊत यांच्यासह त्यांच्या संर्पकातील लोकांना होमक्वारंटाईन करण्याची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकारी यांनी पूर्ण माहिती घेणे आवश्यक होते. परंतु संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटात असतानाही कोरोनाबाबतचे गांभिर्य बाजूला ठेवून केवळ प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचे गलीच्छ काम भाजपची ही सर्व विघ्नसंतोषी मंडळी करीत आहेत. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्हयातील स्वाभिमानी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना वेगळी अपेक्षा करीत नाही. तसेच खा. राऊत हे वैद्यकीय तपासणी करूनच जिल्ह्यात फिरत आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.
www.konkantoday.com