कोरोना विषयी पत्रक हिंदीत काढल्याने महाराष्ट्र संरक्षण संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
महाराष्ट्रात मराठी भाषा ही राज्यभाषा असताना कोरोना विषयी हिंदीतून पत्रक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आले होतेहे पत्रक रत्नागिरीत असलेल्या परराज्यातील कामगारांना प्रशासनाकडून देण्यात येणाऱया अन्न वऔषध तसेच निवासाबाबत माहिती देणाऱ्या हिंदीतून काढलेल्या पत्राला महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग यांनी आक्षेप घेतला आहे याबाबत त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना २१एप्रिल रोजी पत्र पाठवून त्यांच्याकडे लक्ष वेधले आहे यासाठी संदर्भ म्हणून त्यांनी शासनाची मराठी भाषेविषयी काढलेली परिपत्रके जोडली आहेत या पत्रामुळे मराठी राज्यभाषा अधिनियम१९६४ प्रमाणे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे यामुळे हे हिंदीतील पत्रक मागे घेण्यात यावे व संबंधितांवर एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करावी अशी घाग यांनी मागणी केली आहे
www.konkantoday.com