
एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी नौका मत्स्य खात्याच्या पथकाने पकडली
मासेमारीला काही अटी वर परवानगी मिळाल्यावर त्याचा गैरफायदा घेत बेकायदा मासेमारी करणारी नौका
मत्स्य खात्याच्या पथकाने पकडली
ही नाैका रत्नागिरीतील भगवती बंदरापासून साडेअकरा नॉटिकल मैलावर एलईडी दिवे लावून मासेमारी करत हाेती मत्य खात्याच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री दोन वाजता पकडली.भगवती बंदराजवळ एलईडी नौका बेकायदा मासेमारी करत असल्याची माहिती मिळाली , त्यावेळी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त एन.व्ही.भादुले आणि विकास अधिकारी जीवन सावंत गस्तीवर होते. भगवतीबंदरापासून साडेअकरा नॉटिकल मैलावर एलईडी नौका मासेमारी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाठलाग करून एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी तेहसीन मरियम ही अन्वर पांजारी यांची नौका पकडली. सिंधुदुर्गातही अवैधरित्या एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई केली आहे मत्स्य विभागाने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी पहाटे गोव्यातील अवैधरित्या एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई केली. दरम्यान, संबंधित नौकेवर एलईडी साहित्य सापडून आले असून मत्स्य विभागाने नौका जप्त केली आहे.
www.konkantoday.com