
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा.
रत्नागिरी : शिवसेना नेते, सचिव, तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून व जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम व जिल्हाप्रमुख (उत्तर) बाळा खेडेकर यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी गुरुवारी (१० जुलै) गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी १० वाजता शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा भव्यदिव्य बॅनर उभा करून बाळासाहेबांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक व पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत सर्व संघटना यांनी तालुक्याच्या नियोजित ठिकाणी उपस्थित राहून गुरुपौर्णिमा साजरी करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम, शिवसेना जिल्हाप्रमख (उत्तर) बाळा खेडेकर यांनी केले आहे.




