
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
राज्यात 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात तयारी झाली आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.येत्या 30 एप्रिल ते 15 मे दरम्यान स्पाईक येण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आरोग्य यंत्रणेची सगळी तयारी आहे. कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे
www.konkantoday.com